महापालिका हद्दीलगतच्या काही गावांचा समावेश करण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी केली. निधी नसल्याकारणाने या गावांचा समावेश होऊ शकणार नसल्याचे कारण राज्य शासनाने दिले. पण मग पीएमआरडीएकडे तरी निधी कुठे आहे? पीएमआरडीए कागदावरच अस्तित्वात असून अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत आहेत. म्हाळुंगे, सूस या गावांच्या जवळच हिंजेवाडी IT Park, तर अलीकडे स्मार्ट सिटी आहे. हद्दीलगतची गावे महापालिकेत समाविष्ट होतील म्हणून जिल्हा परिषद या गावांकडे दुर्लक्ष करते. या गावांचा विकास करण्याची यंत्रणा सध्या कुठेच अस्तित्वात दिसत नाही. पीएमआरडीए केवळ नियोजन करते. त्यामुळे या गावांचा विकास करण्याचा विचार एकत्रितपणे केला पाहिजे. व ही गावे तातडीने पालिकेत घेण्यात यावी असेल बालवडकर यांनी सुचवले.