Skip to content Skip to footer

जिओ चॅट चे यूजर्स वाढविण्यासाठी जिओ फोन मध्ये लोकप्रिय व्हाट्सअँप नाही…

मुंबई : शुक्रवारी रिलायन्स कंपनीच्या मुकेश अंबानी यांनी जिओ फोन मोफत देण्याची घोषणा केली आणि हा फोन कसा असेल याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण केली.मात्र जिओच्या फोनकडून तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी सोय नसेल.
टेक गुरूंच्या मते, रिलायन्स जिओच्या फीचर फोनमध्ये युट्यूब आणि फेसबुक वापरता येणार आहे, पण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नसेल. रिलायन्स कंपनीचे जिओ चॅट ह्या अँप्लिकेशन चे उसेर्स वाढविण्या साठी कंपनीने हे पॉल उचलले असे “पुणे बुलेटिन” टेक गुरूंना वाटते. त्यामुळे रिलायन्स जिओचा 4जी फीचर फोन व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची नक्कीच निराशा करणार आहे.
50 कोटी ग्राहकांना जिओचा फीचर फोन विकणायचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. त्यासाठी जिओने त्यांच्या 4जी फीचर फोनचे ‘प्री बुकिंग’ सुरू केले आहे. रिलायन्स जिओचे ‘जिओ.कॉम’ या संकेतस्थळावर प्राथमिक माहिती भरून ‘प्री बुकिंग’ सुरू करता येणार आहे. संकेतस्थळावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर रिलायन्स जिओच्या जी फीचर फोनसाठी ‘रजिस्ट्रेशन’ होऊ शकणार आहे.

Leave a comment

0.0/5