Skip to content Skip to footer

सिंहगड किल्ल्याकडे जाणारा घाट रस्ता दुरूस्तीसाठी आठ दिवस बंद राहणार…

पुणे: सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाटात दुपारी दरड कोसळल्याने आठ दिवसांसाठी सिंहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा आदेश जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रमुख असलेले सौरभ राव यांनी दिला आहे.

गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार पर्यटकांना रास्ता उघडण्यआधी काही पडण्यासारखे दगड काढून टाकणे आणि विशिष्ट ठिकाणी सुरक्षा जाळे उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल.

“दरड कोसळल्यानंतर किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी बंद केले आहेत.ह्या आदेशाचा भंग केल्यास  संबंधित अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत”

Leave a comment

0.0/5