Skip to content Skip to footer

पुणे – सोन्याची चेन चोरताना भामटा सेल्फी व्हिडिओमध्ये कैद

पुणे पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेली. विशेष म्हणजे तरुणाच्याच सेल्फी व्हिडिओत चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना या सेल्फी व्हिडिओची मोठी मदत होणार आहे.

https://maharashtrabulletin.com/whatsapp-paid-version/

काय आहे हे प्रकरण?
सेल्फी काढताना दरीत पडतो, कोण रेल्वेतून पडतो असे दुर्दैवी अपघात होतात. मात्र या घटनेत सोन्याची साखळी चोरणारा भामटा सेल्फी व्हिडिओत कैद झाला आहे.
– विशाल हनुमंत दगडे हा मूळचा भिमाशंकर जि. पुणे येथील राहाणारा आहे. तो पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो.
– अनंत चतुदर्शीला तो मित्रांसोबत गणेश विजर्सन मिरवणूक पाहाण्यासाठी आला होता. श्रीमंत दगडुशेठ गणपतीच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला. मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती.
– गणरायाच्या मिरवणुकीत आपल्या अस्तित्वाची क्लिप काढण्याची इच्छा झाली. म्हणून तो आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढू लागला.

– आपली गळ्यातील सोन्याची साखळी गायब झाल्याचे विशालच्या लक्षात आले.
– सेल्फी काढताना मागे उभ्या तरूणाच्या संशयास्पद हालचालींची त्याला आठवण झाली.
– प्रचंड गर्दी असल्याने या युवकाला मागील अनोळखी व्यक्ती काय करत आहे हे समजले नाही.
– साखळी चोरीला गेल्याने त्याने सावध होत सेल्फी व्हिडिओ तपासून पाहिला.
– एक अनोळखी तरूण व्यक्ती गर्दीचा फायदा घेत त्याच्या गळयातील सोन्याची साखळी चोरताना कैद झाल्याचे त्याला दिसले.
– चोरट्याने विशालच्या गळ्यातील साखळी दाताने तोडली आणि त्याला समजण्याच्या आतच तो तेथून पसार झाला.
https://maharashtrabulletin.com/ganpati-bappa-miravnuk-updates-pune/

Leave a comment

0.0/5