Skip to content Skip to footer

google pixel 2 आणि pixel 2 XL आज लाँच होणार, अॅपलला टक्कर देण्याची शक्यता

मुंबई : आज google pixel 2 आणि google pixel 2 XL हे हायटेक फीचर्स Smart Phone लाँच करणार आहे. Google ने HTC सोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत.

फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे.

google pixel 2 स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे.

शिवाय 64GB आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील, असं बोललं जात आहे.

पिक्सेल 2 मध्ये ऑटो फोकस फीचर्ससह 12 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा असू शकतो. तर 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.

Google Pixel 2-Google-Pixel-2
Google Pixel 2

google pixel 2 XL स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्याही लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे.

शिवाय 64 GB आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील. दोन्हीही व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम असेल.

पिक्सेल 2 XL मध्ये 12 मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे फीचर्स मिळतील.

चार्जिंग करताना आयफोन 8 प्लस फुटला, चौकशी सुरु

https://maharashtrabulletin.com/i-phone-8-plus-reportedly-bursts-in-japan-and-taiwan/

दरम्यान दोन्ही फोनच्या बॅटरी बॅकअपविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर असेल, अशी माहिती आहे. तर लेटेस्ट अँड्रॉईड 8.0 ओरिओ सिस्टम देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5