Skip to content Skip to footer

पुणे: वाघोलीत एटीएम फोडणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

पुणे : वाघोली येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणाऱ्या देान जणांना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहाथ पकडले. तर एक जण फरार झाला. ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.

ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) यांना अटक करण्यात आली असुन विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लेाहगाव) हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, लेाणीकंद पोलिसांचे पथक रात्री आव्हाऴवाडी परीसरात गस्त घालत हेाते. साईसत्यम पार्क परिसरातील एटीएमजवळ काहीतरी गेांधळ असल्याची माहीती पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस स्टेशन तसेच कंट्रेाल रुमवरुन गस्त पथकाला मिळाली. पथकाने त्वरीत त्या एटीएमकडे धाव घेतली. यावेळी एटीएमचे शटर बंद हेाते. बंद शटरमध्ये दोन जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत हेाते. तर त्यांचा एक साथीदार बाहेर देखरेख करीत होता. पोलिस आल्याचे कळताच त्याने आतील साथीदाराना माहीती दिली व स्वतःहा फरार झाला.

https://maharashtrabulletin.com/pune-news-crime-cheating-mobile/

पोलिस शटर जवळच दबा धरुन बसले. आतील परिस्थितीचा बाहेरुनच त्यांनी आढावा घेतला. आतील दोघांनी पळून जाण्यासाठी शटर उघडे करताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानी मशीनचा काही भाग काढला होता. तर हत्याराच्या सहाय्याने अऩ्य भाग फेाडण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडे छोटया कटावणी, स्क्रुडायव्हर, पक्कड व अन्य साहित्य सापडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तेारडमल, पोलिस कर्मचारी संतेाष कुलथे, अमोल दांडगे, मेघराज जगताप यांनी ही कामगिरी केली. ते सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता असुन त्यांच्याकडुन अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सुरक्षारक्षकांचा अभाव
एचडीएफसी बॅंकेचे हे एटीएम आहे. तेथे सुरक्षारक्षक तैनात नव्हता. यामुळेच चोरटयांनी हे एटीएम फेाडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील सुरक्षित यंत्रणेमुळे याबाबतची माहीती बॅंकेच्या मुंबई कार्यालयाला कळाली. त्यानी त्वरीत पुणे पोलिसांच्या कंट्रेाल रुमला कळविली. तेथुन लोणीकंद पोलिसांच्या पथकाला ही माहीती मिळाली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5