हिवाळा आला की आपण व्हॅसलीन पॅक खरेदी करुन घरात आणतो. व्हॅसलीन तुम्ही वर्षभर वापरले तरी चालते. त्वचेला लावण्याव्यतिरिक्त व्हॅसलीन चे फायदे आहेत.
व्हॅसलीनचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे ओठांचे लिपस्टिक पूर्णपणे काढून टाकणे. लिपस्टिक ओठांवरुन लगेच निघून जातेच असे नाही. त्यासाठी व्हॅसलीनमध्ये थोडीशी साखर मिक्स करुन ते ओठांवर लावा आणि थोड्या वेळाने पुसा. लिपस्टिक तर पूर्णपणे निघून जाईलच शिवाय ओठ ओलसरही राहतील.
हेअर डाय लावताना तो काही वेळेस मानेवर, कपाळावर आणि कानावर लागला जातो. हे टाळण्यासाठी हेअर डाय लावण्यापूर्वी या भागांवर व्हॅसलीन लावा आणि डाय लावून झाल्यावर ते पुसून टाका. त्यामुळे चेहऱ्यावर किंवा मानेवर कोणताही डाग रहात नाही.
गालावर आणि पापण्यांवर व्हॅसलीन लावल्यास कोणत्याही मेकअपवर किंवा मेकअपशिवायही चेहरा सुंदर दिसतो.
https://maharashtrabulletin.com/exercise_can_cure_diabetes/
पापण्यांचे केस खूप विरळ असल्यास थोडेस व्हॅसलीन झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावा. पण हे करताना व्हॅसलीन डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्या.
केसाना फाटे फुटत असल्यास थोड्याशा व्हॅसलीनमध्ये सी सॉल्ट मिक्स करा. हा पॅक केसांवर लावल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
व्हॅसलीनमुळे त्वचेवरील मृत पेशी तर निघून जातातच शिवाय त्वचेला मॉईश्चर मिळाल्याने ती कोरडी पडत नाही आणि फ्रेश दिसू लागते.