Skip to content Skip to footer

अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण – रावसाहेब दानवे

पुणे : राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जनतेची सेवा हेच ध्येय मानून काम केले पाहिजे. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदतीची योजना आणली असून, ती जगातील सर्वोत्तम योजना आहे, असेही ते म्हणाले.
amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाउंडेशन, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशन, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अमोल बालवडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिरच्या उद्धाटनप्रसंगी दानवे बोलत होते.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे आयोजक व नगरसेवक अमोल बालवडकर, शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले राहुल दादा बालवडकर, नगरसेवक हेमंत रासने, दिलीप वेडे पाटील, सम्राट थोरात, स्वप्नाली सायकर, ज्योती गणेश कळमकर, उमेश गायकवाड तसेच प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, इतर मान्यवर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद व ग्रामस्थ मंडळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवान अभिजीत कटके याचा रोख 5 लाख रुपये देऊन सत्कार करण्यात आला.


Abhijeet-katke-and-amol-balwadkar

या शिबिरात सर्व नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, सल्ला, औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुबी हॉल क्लिनिक, भारती हॉस्पिटल, साई श्री हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पावन हॉस्पिटल, औंध चेस्ट हॉस्पिटल ह्या सारख्या नामांकित हॉस्पिटल्सनी ह्या शिबिरात सहभाग घेतला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. बालेवाडी येथील दसरा चौकातील संजय फार्म येथे शनिवार व रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत महाआरोग्य शिबिर असणार आहे.
amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकरamol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर
तर, बाजार व फूड कार्निव्हल प्रत्येक शनिवार व रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे.

>एक कार्यकर्ता दहा लाभार्थी योजना पुण्यातील आठ मतदार संघात राबविणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात सांगतल्यावर त्याचाच धागा पकडून पुण्यातल्या गोष्टींचे अनुकरण सगळीकडे होते. त्यानुसार एक कार्यकर्ता दहा लाभार्थी ही पुण्यात सुरु झालेली योजना राज्यभर राबविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, व्यक्तिगत कार्यक्रमांना सामाजिक टच देण्याचे भान राजकीय लोकांना असले पाहिजे. हे काम अमोल बालवडकर करीत आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा
amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

तसेच, एक कार्यकर्ता 10 लाभार्थी असे योजना पुण्यातील 8 मतदार संघात राबविणार आहे. यामाध्यमातून गरजू व शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतील.

किती काम झालं याबरोबरच किती काम राहिलंय याचंही भान राजकीय व्यक्तीला असले पाहिजे. अमोल बालवडकर उत्तम काम करीत असून सर्व भाजपची टीम त्यांच्यासोबत असेल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, लठ्ठपणा, श्वसनाचे विकार, त्वचा रोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, आतड्याचे विकार आदी सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, त्यावरील शस्रक्रिया व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे.

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

यावेळी मोफत अवयवदानाचे फार्म भरून घेण्यात आले. तब्बल 3 हजार नागरिकांनी शिबिरासाठी नावनोंदणी केली असून सुमारे 7 हजार नागरिकांची तपासणी यामध्ये करण्यात येणार असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

प्रत्येक शनिवार व रविवारी शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हल!<

बालेवाडीतील साई चौकात प्रत्येक शनिवारी व रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरणार आहे. त्याचे उद्घाटन आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. हा आठवडे बाजार प्रत्येक शनिवार व रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे.

प्रभागातील नागरिकांसाठी थेट शेतकऱ्यांचा शेतीमाल मिळणार आहे. तसेच, खास खवय्यांसाठी ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे थेट शेतकऱ्याला पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. ग्रामीण खाद्य पदार्थांची विक्री होणार आहे.

यासोबतच मनोरंजनासठी घोडागाडी, बैलगाडी व उंटावरील सफारी तर, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोष्टींबरोबरच नंदी बैल, वासुदेव यामध्ये असणार आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हे काम केले जाणार असल्याने महिलांनाही रोजगार मिळणार आहे, अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर  यांनी यावेळी दिली.

Leave a comment

0.0/5