ज्या धाडसी मुलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील आतंकवादी अजमल कसाब ला फाशी झाली, त्याच मुलीला या साक्षीमुळे आजपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिला एक साधं भाड्याने घर देण्यास सुद्धा लोकं नकार देत होते. मागच्या वर्षीपर्यंत तिला मुंबईत अक्षरशः घर भाड्याने घेण्यासाठी वणवण फिरावं लागलं होतं. मुंबईची रहिवासी असलेल्या देविका रोटावनला तिने केलेल्या देशसेवेबद्दल मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या परिवाराला भाड्याने घर दिल्यास त्यांच्या देशभक्तीमुळे आपल्यावर सुद्धा संकट येईल अशी भीती लोकांमध्ये होती.
आपण केलेल्या देशभक्तीमुळे एवढी मोठी किंमत मोजावी लागेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. मुंबईचा 26/11 हल्ला होऊन 10 वर्षे लोटली आहेत. देविका आणि तिच्या वडिलांना या साक्षेची 9 वर्षे किंमत मोजावी लागली. 26/11 हल्ला झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जेव्हा कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल बेछूट गोळीबार करत होते तेव्हा देविका भाऊ आणि वडीलांसह तिथे होती. तिच्या पायात कसाबची एक गोळीही लागली होती. यानंतर देविका आणि तिचे वडील सरकारी साक्षीदार बनले होते. देविकाच्या साक्षीने कसाबला फाशी झाली होती.
अंतर ठेवून आहेत नातेवाईकही-
देविका आणि नटवरलाल यांनी सांगितले की एवढे वर्षे उलटूनही गावकडील नातेवाईक आमच्या सोबत संबंध ठेवल्यास ते सुद्धा आतंकवाद्यांच्या निशाण्यावर येतील या भितीने अंतर ठेवून आहेत. याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने लग्नपत्रिकेत त्यांचे नाव टाकले नाही. नटवरलालमुलगी देविका आणि मुलगा जयेश सोबत बांद्रा मधील भाड्याच्या घरात राहतात. जिथंही ते राहायला जातात तिथे लोकं त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कारण काय तर त्यांनी 26/11 हल्ल्यामुळे कोर्टात साक्ष दिली. पुण्यात राहणाऱ्या देविकाच्या मोठ्या भावानेची त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले आहे. त्याने याना साधं लग्नाला सुद्धा बोलवलं नाही.
मोदींकडून सुद्धा नाही मिळाले उत्तर-
नियमित घर बदलावा लागत असल्याने नटवरलाल यांची इच्छा होती की त्यांना सरकारी कायमस्वरूपी घर मिळावं. या समस्येला कंटाळून देविकाने पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले आहे. पण त्याच अजून काही उत्तर नाही मिळालं. त्यांना मोदींना भेटून ही समस्या मांडायची आहे पण मोदींची भेट काही त्यांना मिळाली नाही. त्यांनी खुप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नाही. सध्या देविका फक्त 20 वर्षाची आहे. पण या हल्ल्यामुळे तिचे शिक्षण प्रभावित झाले आहे. शाळेतील परीक्षा सुद्धा ती नापास झाली आहे.