मुंबईच्या लाईफलाईनने 4 दिवसात घेतला 27 जणांचा जीव

मुंबईच्या लाईफलाईनने 4 दिवसात घेतला 27 जणांचा जीव | 27 people died in 4 days mumbai local train accident

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई लोकलच्या तीनही मार्गावर झालेल्या अपघातात गेल्या ४ दिवसांत एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ३९ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मंदार अभ्यंकर यांनी मुंबई ट्रेन अपडेट या फेसबुक पेजवर दिली आहे. सदर माहिती मुंबई रेल्वे पोलिसांनी गोळा करुन ती फेसबुक पेजवर टाकली आहे.

दररोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करतात. कमालीची गर्दी लोकलला असल्याने दरवाजातून पडून रोज अनेकांचा मृत्यू होतो. तर अनेकांना कायमचे अपंगत्व येते. मुंबईत गेल्या ४ दिवसात लोकलच्या अपघातांमध्ये एकूण २७ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले असल्यामुळे मुंबईची लाईफलाईन आता डेथलाईन ठरू लागली आहे का, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

१२ जानेवारीला ९, १३ जानेवारीलाही ४, १४ जानेवारीला ४ आणि १५ जानेवारीला १० अशा एकूण २७ जणांचा मृत्यू झाला. तर या चारही दिवशी लोकलमधून पडून एकूण ३९ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here