Skip to content Skip to footer

खेड चाकणचे एअरपोर्ट पुरंदरला जाण्यामागे राजकारण…? वाचा सविस्तर

पुणे: खेड तालुक्यात नियोजित होणारे विमानतळ रद्द करून ते, पुरंदर येथे स्थालांतर करण्याचा निर्णय भारतीय विमान पतन प्राधिकरणाने घेतला आहे. त्या बाबतचे पत्र सुद्धा विमान पतन प्राधिकरणाने तेथील जनतेसाठी जाहीर केले आहे. येथूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे. काहीजणांनी एअरपोर्ट पुरंदरला जाण्यामागे राजकारण आहे असे आरोप केले.पण त्या घटनेमागे काय वास्तव आहे. याचा आम्ही शोध घेतला तेव्हा हि माहिती समोर आली.

खेड चाकण येथील भौगोलिक कारणांमुळेच चाकण विमानतळाची जागा बदलावी लागली होती असे ही विपप्रा यांच्या कडून सांगण्यात आले आहे. याचे कारण असे की, खेड चाकण येथील जी जागा एरपोर्टसाठी निवडण्यात आलेली होती ती जागा विमान एरपोर्टच्या दृष्टीने असमाधानकारक होती असे विमान पतन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणा नंतर स्पष्ट करण्यात आले आहे.

चाकण, राजगुरू आणि खेड ही शहरे पुणे शहरातील उत्तर-पश्चिम दिशेला येतात. हा प्रदेश डोंगरपट्याचा असल्यामुळे तेथील जमीन ही वरखाली म्हणजे ओबड-धोबड असल्या कारणामुळे धावपट्टीला अनुकूल अशी जमीन ती नाही आहे हे सांगण्यात आले होते. तसेच प्रस्तावित धावपट्टी ही पूर्व-पश्चिम दिशेलाच असावी ही अट प्राधिकरणाची आधी पासूनच होती. या निकषानुसार मे २००५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत चाकण-खेड परिसरात विमान प्राधिकरण यांच्या तर्फे सहा वेळा सर्वेक्षण करण्यात आले होते. या जागांमध्ये विमान उड्डाणासाठी धावपट्टी अनुकुल नसल्याने तसेच जागा दिशा आणि पर्यावरणाच्या निकषात त्या बसत नसल्यामुळे ही ठिकाणे विमानतळासाठी योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आलेला होता तसेच ज्या जागा प्राधिकरणाने पहिल्या होत्या त्या सर्व जागा सहयाद्रीच्या पर्वत रांगाच्या जवळ वसल्या होत्या तसेच विमान उड्डाणासाठी पर्वतरागांमुळे अडथळा निर्माण होईल असा ही अहवाल देण्यात आलेला होता.

मे २००५ मध्ये चाकण येथे दोन जागांचे सर्वे करण्यात आले होते, पण भीमा नदीच्या दोन्ही बाजूला डोंगराळ भाग असल्या कारणामुळे एकच धावपट्टी शक्य असल्याचा अहवाल देण्यात आलेला होता. २००९ मध्ये राजगुरू येथील पुन्हा जागेची पाहणी करण्यात आलेली होती परंतु हा भाग पूर्णपणे टेकड्यांनी वेढला असल्याचे नमूद करण्यात आले होते. तिसऱ्यांदा ७ ऑगस्ट २०१२ मध्ये उपग्रह द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात भामा नदीचे पुर्नवसन करुण नदीची दिशा बदलून धावपट्टी तयार करता येणे शक्य होते परंतु नदीची दिशा मध्ये बदल केले तर ५५०० एकर बागायती शेतीची जमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असते तसेच त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न ही उपस्थित झाला असता हे मुख्य कारण होते.

त्यानंतर १४ मे २०१३, ८ फेब्रुवारी २०१६ आणि २ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वेक्षण झाले. त्यामध्ये टेकड्यांचे नैसर्गिक अडथळे, उंच-सखल भाग, पूर्व-पश्चिम धावपट्टी करणे शक्य नाही असा अहवाल देण्यात आला. पर्वतरांगांचे अडथळे असलेल्या ठिकाणी विमानतळ करण्याचा प्रयत्न झाल्यास पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होऊ शकेल, असेही प्राधिकरणाने सांगितले. या कारणामुळेच सदर खेड चाकण येथील प्रस्थावित विमानतळ पुरंदरला तेथील भौगोलिक व अनुकुल परिस्थितीमुळे हलविण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5