दुर्ग संवर्धन करून किल्ले हडसर वर झाली पहिल्यांदा शिवजयंती साजरी.

दुर्ग संवर्धन करून किल्ले हडसर वर झाली पहिल्यांदा शिवजयंती साजरी | Shivjayanti at hadsar fort

शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लब जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली *मरहट्टे सह्याद्रीचे trekking & fort restoration group यांनी शिवजयंतीच औचित्य साधून दिनांक १६ व १७ फेब्रुवारी रोजी या दोन दिवशी दुर्ग संवर्धन करून रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी किल्ले हडसर वर शिवजयंती मोठ्या उत्साहात संवर्धन करून साजरी करण्यात आली.फोक्सवॅगन इंडिया मधील आम्ही सर्व कामगार महिन्यातील एक ते दोन रविवार हे दुर्ग संवर्धन या साठी असे गेली दोन महिने किल्ले हडसर वर संवर्धन करतोय.शिवाजी ट्रेल व शिवाजी ट्रेल चे विश्वस्त विनायक खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम गडावर चालू आहे.यामध्ये गडावर असणार मुख्य प्रवेशद्वार व गडाचा दुसरा दरवाजा मधील अडीच ते तीन फूट असणारी माती, त्याच प्रमाणे जानेवारी मध्ये १६ ला झालेल्या मोहिमेत धान्य कोठार मधील पूर्ण माती काढून आपला असणारा हा अमूल्य वारसा पुढील पिढीस कसा दाखवता येईल या साठी हि धडपड.

गेली कित्तेक वर्ष दरवाजा मध्ये दगड, माती पडलेली होती..दोन दिवसाच्या ४० लोकांच्या प्रयत्ना नंतर हे सगळं बाहेर काढून दरवाज्याला मोकळा श्वास घेता यावा म्हणून २ दिवसाच्या प्रयत्नांना शेवटी यश अल आणि जेंव्हा पूर्ण साफ झाल्या नंतर जे काही समोर होत ते शब्दामध्ये वर्णन न करण्या सारखच आहे.जे लोक गेली २-३ वर्षा मध्ये गडावर गेली असतील तर त्यांना त्या गोष्टीची प्रचिती येईल.

रविवारी सकाळी संवर्धन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आल. त्याच प्रमाणे महादरवाज्याला तोरण लावून, ध्वजारोहण करण्यात आले.शंभू महादेव मंदिरात अभिषेक करून धान्य कोठरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या साठी फोक्सवॅगन इंडिया मधील पेंट शॉप डिपार्टमेंट चे प्रोडक्शन हेड मृदुल श्रीवास्तव सर, प्रोडक्शन इंजिनिअरिंग हेड निलेश यादव सर,विनायक खोत सर,चावांड दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रभाकर कर्पे सर,तसेच मारुती जाधव सर या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.
दुर्ग संवर्धन करून हीच छत्रपती शिवरायांना शिवजयंती निमित्त मानवंदना होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here