Skip to content Skip to footer

ये नया हिंदुस्थान है” इट का जवाब पत्थर से ही मिलेगा…….

१४ फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांचा हल्यात सीआरपीएफचे एकूण चाळीसच्यावर जवान शाहिद झाले होते. या विरुद्ध सर्व देशात संतापाची लाट पसरलेली होते. आपल्या शेजारी असलेल्या शत्रू राष्ट्रातील ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. या हल्या विरुद्ध भारताने सुद्धा सडेतोड उत्तर दयावे हीच सर्व भारतीयांची भावना होती. परंतु यावर सुद्धा विरोधी पक्षाने राजकारण चालू केलेले होते आणि कुठे तरी भाजपा अध्यक्ष नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वारंवार सूचना देऊन सुद्धा भारतात अवैध्यरित्या घुसखोरी करून देशाला नुकसान पोहचविण्याचे काम दशहतवादी संघटना आणि त्यांना मदत करणारे शत्रू राष्ट्र करतच आहे.
याला चोख प्रति उत्तर आपल्या भारतीय सैन्यांनी विशेष करून वायू सैनिकांनी दिलेले आहे. २५ फेब्रुवारी २०१९ ला गाढ झोपेत असलेल्या पाकव्यप्त काश्मिरी खोऱ्यात भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून जैश- ए- मोहम्मद या दशहतवादी संघटनाच्या तळांना भारतीय वायू सेनेच्या कारवाहीत संपूर्णपणे उध्वस्थ करण्यात आलेले आहे. या कारवाही दरम्यान २०० च्या आसपास दशहतवाद्याचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जो कोणी भारताकडे वाईट नजरेने पहिल त्याला चोख उत्तर दिले जाईल असेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखविले आहे. आज दशहतवाद्यांची कंबरच वायू सेनेने मोडलेली आहे.
आज पुलवामा हल्ल्याला दिलेल्या चोख प्रति उत्तरेमुळे संपूर्ण देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा राहिला आहे. काँग्रेस काळात सुद्धा झालेल्या दशहतवादी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सुद्धा काँग्रेसने राजकारण केले होते. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता या हल्ल्याला जवानच चोख प्रति उत्तर देतील असे बोलून दाखविले होते आणि जे बोलले तेच झाले आज दशहतवादी संघटनांच्या कारवाहीला सडेतोड उत्तर देऊन भारतीय जवानांनी सिद्ध केले की, भारतीय जवान येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तयार आहे असेच दिसून येते आणि पुन्हा दशहतवादी भारतावर आणि भारतीय सैनिकांवर हल्ला करताना १० वेळा नाही तर १००० वेळा विचार करेल.
या झालेल्या हल्यानंतर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रसिद्दी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया पहिल्या तर यु-टर्न घेतलेला आहे. त्यातच राज ठाकरे यांनी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर घणाघाती आरोप लावले होते. आता राज ठाकरे जनतेच्या रडारवर आलेले आहे. यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल. परंतु देशाच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयात जनता नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे असेच आजच्या परिस्थितीमुळे जाणवते यावर केंद्रातील विरोधी पक्षात बसलेल्याना बोलण्यासाठी काहीच जागा उरलेली नाही आहे आणि पुनः एकदा भारतीय जवानांचे हार्दिक अभिनंदन.

Leave a comment

0.0/5