Skip to content Skip to footer

.तर अभिनंदन यांना सोडण्यास पाकिस्तान तयार

बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलेल्या हिंदुस्थानच्या मिग-21 या विमानाचे पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे जाहीर झाल्यानंतर हिंदुस्थानने त्याला तत्काळ सोडा असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट् मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सीमेवरील तणाव कमी होत असेल तर पाकिस्तान अभिनंदन यांना सोडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

कुरेशी यांनी पाकिस्तानच्या जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे. ‘आम्ही हिंदुस्थानच्या जवानाला सोडण्यास तयार आहोत. पंतप्रधान इम्रान खान हे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास तयार आहेत’, असे कुरेशी यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी हिंदुस्थानकडून पुलवामा हल्ल्याचे डोझियर देखील मिळाल्याचे सांगितले आहे.

हिंदुस्थानने अभिनंदन यांना तत्काळ सोडा असे पाकिस्तानला बजावले आहे. तसेच हिंदुस्थान जवानाच्या बदल्यात कोणतीही तडजोड करणार नाही. पाकिस्तानला जवानाला विनाअट सोडावे लागेल असे हिंदुस्थानने पाकिस्तानला बजावल्याचे समजते. तसेच जवानाला इजा झाल्यास पाकिस्तानवर मोठी कारवाई करू असा इशारा देखील हिंदुस्थानने दिला आहे.

Leave a comment

0.0/5