Skip to content Skip to footer

राज ठाकरेंना आला पाकचा पुळका मोदींनी कारवी आता पाकशी चर्चा..

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ भारतीय वायू सेनेने पाकव्यप्त काश्मिरी भागात केलेल्या कारवाहीत सुमारे २०० च्यावर दशहतवादी मृत्युमुखी पडलेले होते. या सैनिकाचे सर्व स्थरातून कौतुक होतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आरोप करून स्वतःला भारतीय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपले स्थान गमावून बसले होते आणि सोशल मीडियावर सर्व देशातून टीकेचे धनी बनले होते. आता पुन्हा एकदा आपल्या वागण्यामुळे राज ठाकरे अडचणीत आले आहेत.

राज ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधांनाना अजब सल्ला दिला आहे. त्यांच्या या अजब सल्या वरून राज ठाकरे देशातील महाराष्ट्रात राहतात की, पाकिस्तानात असा प्रश्न आज देशातील जनतेला पडलेला आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपदेशून आपल्या पत्राद्वारे ” पाकिस्तानचा हेतू स्वच्छ असेल तर मोदींनी संधी गमावू नये” असे बोलून राज ठाकरे यांनी स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. आज साऱ्या विश्वाला पाकिस्तानची सवय माहिती असताना राज ठाकरे यांनी स्वतःचे आत्मपरीक्षन करावं ह्याच राज ठाकरे यांच्या मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना हा सल्ला द्यावा कारण आज पर्यंत पाकिस्तानला विरोध करणारे हेच मनसे आज आपल्या नियमात बदल करताना दिसत आहे. जणू येणाऱ्या पाकिस्तानातं राज ठाकरे निवडणुकीला उतरणार असल्या सारखे आज बाजू घेत आहे.

अजित डोवाल यांच्यावर आरोप लावून आणि आता पाकिस्तानची बाजू घेऊन राज ठाकरे यांचे प्रेम शत्रू राष्ट्रावर कसे काय वाढले आहे यावर आज शंका निर्माण केली गेली पाहिजे. आज आपल्या ४२ च्या वर जवानांचा कुठे तरी राज ठाकरे यांनी अपमान केला आहे. साऱ्या राष्ट्रात टीकेचे धनी बनणाऱ्या पाकिस्तान राष्ट्राचे गुणगान गाण्यात राज ठाकरे व्यस्थ असताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांच्या बातमीचा सहारा घेते पाकिस्तानी मीडियाने भारताने लावलेले आरोप फेटाळून लावलेले होते त्यामुळे राज ठाकरे देशात झीरो आणि पाकिस्तानात हिरो झाले होते.

Leave a comment

0.0/5