Skip to content Skip to footer

Abhinandan: IAF पायलट अभिनंदन वर्तमान वाघा बॉर्डरवर दाखल, थोड्याच वेळात भारतात दाखल होणार

भारतीय वायुदलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान थोड्या वेळातच पाकिस्तानहून भारतात येणं अपेक्षित आहे.

त्यांना घेऊन पाकिस्तानी लष्कराचा ताफा अटारी बॉर्डरवर दाखल झाला आहे.

ताजे अपडेट्स

अटारी बॉर्डरवर भारताचे सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित.
वाघा बॉर्डरवर अभिनंदन वर्तमान दाखल.
पाकिस्तानकडून बिटिंग रिट्रिट नंतर अभिनंदन भारतात येणार.
पाकिस्तानकडून सध्या सर्व औपचारीकता पूर्ण केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावं आणि शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचं पाऊल म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती.

दरम्यान, अभिनंदन यांच्या परत येण्याच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवर दररोज होणारी बिटिंग रिट्रिट आज रद्द करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिव दुलार सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

अभिनंदन यांना भारतात परत आणण्यासाठी जिनेव्हा कन्वेंशनचा प्रोटोकॉल पाळला जाईल, असं निवृत्त मेजर जनरल राज मेहता यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं. त्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे उलगडून सांगितली.

“अभिनंदन यांना इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीकडे सोपवण्यात येईल. मग त्यांची तपासणी करण्यात येईल की त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाली की नाही? अभिनंदन यांना ड्रग्ज देण्यात तर आली नाही ना, याची तपासणी देखील होईल,” मेहता सांगतात.

“त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात आला तर नाही ना, हे तपासलं जाईल. जिनेव्हा कंव्हेंशनप्रमाणे हे तपासणं गरजेचं असतं. नंतर त्यांचं डॉक्युमेंट तयार केलं जाईल. त्यानंतर त्यांना भारतीय वायुदलाकडे सुपूर्त केले जाईल.

 

Leave a comment

0.0/5