Skip to content Skip to footer

माजी आमदार विलास लांडे प्रमाणे अमोल कोल्हे होणार बळीचा बकरा ?

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक छोट्या-मोठया पक्षात कार्यकर्त्यांची अदला-बदली होतच असते. अनेक जण आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. नारायण राणे, छगन भुजबळ त्यातील काही उदाहरणे आणि महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. आता अजून एक नाव निवडणुकीच्या तोंडावर समोर येत आहे. शिवसेना मावळचे संपर्क प्रमुख तथा सिने स्टार अभिनेता अमोल कोल्हे यांनी आपल्या हातातील शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याचे ठरविले आहे. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक राहिलेले डॉ. कोल्हे यांनी शिवसेना उपनेते व पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

डॉ. कोल्हे स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेमुळे अधिक चर्चेत आहेत. विशेषतः राजा शिवछत्रपती ही त्यांची ऐतिहासिक मालिका अधिकच गाजली होती. परंतु हिंदुत्वादी शिवसेना पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या निर्णयाने त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी न्यायच दिलेला नाही असे लोकांचे मत आहे. राष्ट्रवादी त्यांचा फक्त स्टार प्रचारक म्हणूनच वापर करून घेणार हे सत्य आहे. परंतु जी परिस्थिती विलास लांडे यांची राष्ट्र्वादीने केलेली आहे तीच परिस्थिती कालांतराने अमोल कोल्हे यांची होणार हीच आजची सत्य परिस्थिती आहे. आज नावा रुपाला आलेले अमोल कोल्हे याचे पूर्ण श्रेय शिवसेना पक्षाचे आहे असे खुद्द कोल्हे यांनी मुलाखत दरम्यान बोलून दाखविले आहे.
आज राष्ट्रवादी पक्षात असलेले विलास लांडे यांची परस्थिती “ना घर का ना घाट का” अशीच झालेली दिसून येते. आज तीच परिस्थिती निवडणुकीच्या नंतर अमोल कोल्हे यांची होणार यात शंका नाही . आज स्टार प्रचारक म्हणून कुठेतरी राष्ट्रवादी अमोल कोल्हे यांना महाराष्ट्रभर फिरवणार अशीच स्थिती काही दिवसांनी दिसून येणार आहे. आज विलास लांडे यांचे राजकीय वजन संपूर्णपणे संपलेले आहे आणि त्याला फक्त राष्ट्रवादी जबाबदार आहे. अमोल कोल्हे यांची तीच परिस्थिती होताना दिसून येईल. परंतु अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कुठेतरी त्याची छबी महाराष्ट्र्रातील जनतेच्या नजरेत उतरणार असेच चिन्ह दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5