Skip to content Skip to footer

AirStrike होय, घटनास्थळावरून मृतदेह उचलून नेताना पाहिले, प्रत्यक्षदर्शींनी केली पोलखोल

पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून AirStrike केला. हिंदुस्थानच्या मिराज 2000 या लढाकू विमानांनी बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. परंतु हिंदुस्थानातीलच काहींनी सैन्याच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आणि याचे पुरावे मागितले. परंतु आता हा AirStrike झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिले ते समोर आले आहे.

26 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास हिंदुस्थानी वायुसेनेने बालाकोटमधील जैशच्या ठिकाणांवर हल्ला केला. ज्या ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले त्या ठिकाणापासून जवळच राहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. ‘बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही तासांनी येथे आलेल्या रुग्णवाहिकेतून मृतदेह उचलून नेण्यात आले. यातील काही जण पाकिस्तानी सैन्यात काम केलेली होती. यात एका आयएसआय अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ने याबाबत माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी हिंदुस्थानी लष्कराने हल्ला केलेल्या स्थळाजवळ राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. येथे स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या लोकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, AirStrike नंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. परंतु त्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता. सैन्याने स्थानिक पोलिसांना देखील घटनास्थळी जाण्यास मज्जाव केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने रुग्णावाहिका घेऊन आलेल्या ड्रायव्हरचा मोबाईलही हिसकावून घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर येथून मृतदेह उचलून नेण्यात आल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Leave a comment

0.0/5