नाणार प्रकल्पग्रस्थांना दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी पळाला.

नाणार-uddhav-thackeray

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनी हस्तांतरीत करण्याचा अध्यादेश मागे घेऊन अखेर तेथील स्थानिकांच्या जमिनी परत करण्याचे आदेश दिलेले आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी फटाके आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुद्धा आभार मानले आहे.

नाणारप्रकल्प रद्द करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे नाणार आणि आसपासच्या 14 गावांवरचे संकट टळले आहे.

प्रकल्प रद्द झाल्याचे वृत्त समजताच नाणारसह संपूर्ण कोकणात एकच जल्लोष झाला. पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी ‘शिवसेना झिंदाबाद…’, ‘एकच जिद्द… रिफायनरी झाली रद्द’ अशा घोषणांनी कोकण दुमदुमून गेले.

प्रकल्पग्रस्थ स्थानिक आणि शेतकरी वर्गाने काही महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतलेली होती. या भेटी दरम्यान सदर प्रकल्प होणार नाही त्यासाठी सत्तेत असलेले शिवसेना मंत्री भांडतील असे वचन ग्रामस्थांना उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

नाणार-Nanar-Uddhav-Thackerayयुतीच्या निर्णयावेळी शिवसेना पक्षाने भाजपा बरोबर युती करताना आधी नाणार रद्द करा नंतर युतीचे बोला असे खडसावून मुख्यमंत्र्याना सांगितले होते.

अखेर युतीच्या एकत्रित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्यात येईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिले होते.

अखेर मुंख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाला स्थगिती दिली गेली आहे तशी घोषना सुद्धा शासनाकडून करण्यात आलेली आहे.


“जे बोलतो ते करून दाखवते” या शब्दाची प्रचित पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राला दिसून आलेली आहे.

नाणार प्रकल्पविरोधी शेतकरी आणि मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी रिफायनरीची अधिसूचना रद्द झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत शिवसेनेचे आम्ही ऋणी असल्याचे सांगितले.

त्यामुळे कोकणवासीयांच्या विश्वास अजूनच शिवसेनेवर वाढलेला आहे.

भारताने डिक्शनरीमधील ‘अभिनंदन’ शब्दाचा अर्थच बदलला – मोदी

ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आणि सुरुवातीपासूनच शिवसेनेने घेतलेली प्रकल्पविरोधी भूमिका यामुळे अखेर सरकारला नाणार रद्द करावाच लागला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here