Skip to content Skip to footer

औरंगाबादमधील डॉक्टरचे दहशतवादी कनेक्शन?

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या अन्नसाठ्यात विष मिसळण्याचा कट आयएसआय (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) आणि एमआय (पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स) ने आखला होता. काही दिवसांपूर्वी या कटाबाबतची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला दिली होती. औरंगाबादमधील या डॉक्टरचा या कटात समावेश असल्याचा संशय एटीएसला आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताने सुखरुप मायदेशी परत आणले.

या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्यासाठी पाकिस्तान जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट आखत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना वेळीच या कटाची माहिती मिळाल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जवानांसाठीचे अन्नपदार्थ आणि रेशन सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगायला सांगितले आहे. दरम्यान, या कटाशी औरंगाबादमधील डॉक्टरचा संबंध असल्याच्या संशयावरून त्याला एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5