जुन्नर | माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. ते जुन्नरमध्ये बोलत होते.
अमोल कोल्हे यांना ‘मराठा’ म्हणून नव्हे तर ‘माळी’ म्हणून शिरूरच्या निवडणुकीत उतरवले आहे, असं वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जन्माला येणार प्रत्येकजण हा मोठा भाग्यवान आहे. सर्वांत मोठं प्रेरणास्थान याच परिसरात आहे एक शिवाजी महाराज आणि दुसरं संभाजी महाराज. असंही कोल्हे यावेळी म्हणाले.
दरम्यान, कुणी कितीही कोल्हेकुई करा शिरूरमध्ये मीच जिंकणार, असा विश्वास शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी व्यक्त केला आहे.