Skip to content Skip to footer

आता समुद्रमार्गे धुसफूस सुरु; भारतीय पानबुडी हद्दीत घुसल्याचा पाकचा दावा

नवी दिल्ली | भारतीय पानबुडी आमच्या हद्दीत घुसली होती पण आम्ही तिला हुसकावून लावली, असा दावा पाकिस्तानी नौदलाने केला आहे.

26/11 नंतर दुसऱ्यांदा भारतीय पानबुडीने आमच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

भारतीय नौदलाचे प्रमुख अ‌ॅडमिरल सुनील लांबा यांनी आजच सकाळी भारताला समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर लगेचच पाकिस्तानने प्रतिदावा केला आहे.

दरम्यान, भारतीय पानबुडी जरी आमच्या हद्दीत घुसली असली तरी आम्ही तिला लक्ष्य केलं नाही. कारण आम्हाला शांती हवी आहे, असं पाकिस्तानच्या नौदल प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5