हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या जीवनावरील चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग यानं काम करावं, अशी मागणी नेटिझन्सनं केली आहे. सोशल मीडियावर ही मागणी करण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचं विमान कोसळलं होतं. अभिनंदन 1 मार्च रोजी पाकिस्तनातून परत आले होते.
बॉलिवूड निर्मात्यांमध्ये अभिनंदन यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्यासाठी चढाओढ लागली आहे.
दरम्यान, रणवीर सिंग सध्या कपिल देव यांच्या जीवनावरील ’83’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.