Skip to content Skip to footer

जैश-ए-मोहम्मद अशी संघटना आमच्याकडे अस्तित्वच नाही, पाकिस्तानचा अजब दावा

इस्लामाबाद : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरने स्विकारली होती. आम्हीच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्याने केल्यानंतर भारताने त्या विरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. भारत आणि पाकिस्तानमधील त्यानंतर वाद टोकाला गेला. तर दहशतवादाला खतपाणी घालू नका, कारवाई करा अशी तंबी अमेरिकेने दिली होती. तसेच मसूद अझरवर कारवाई करण्याची मागणी भारतानेही केली.

पण पाकिस्तानमध्ये मसूद नसल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी त्यानंतर मसूद पाकिस्तान असून तो आजारी असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानमधून जैशचे कार्य हे चालविण्यात येत आहे. असे असतानाच जैश-ए-मोहम्मदचे देशात अस्तित्वच नसल्याचे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानामध्ये मसूद अझहरची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे अस्तित्व नसल्याचा दावा आता पाकिस्तानने केला आहे. ‘सीएनएन’ या वृत्तवाहीनीला दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी तसा दावा केला आहे, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने केला आहे.

दरम्यान, असा दावा केला पाकिस्तानने असताना पाकिस्तानचे परराष्ट मंत्री महमूद कुरेशी म्हणाले होते की, पंतप्रधान इम्रान खान यांच्या संपर्कात मसूद अझर असल्यामुळे पाकिस्तानच्या नव्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a comment

0.0/5