सलमान खान बनणार मध्यप्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर; मुख्यमंत्री कमलनाथ यांची माहिती

सलमान खान बनणार मध्यप्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर; मुख्यमंत्री कमलनाथ यांची माहिती | Salman Khan to become brand ambassador of Madhya Pradesh;

बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खान आता मध्य प्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. आपण सलमान खान यांच्याशी याबाबत चर्चा केली असून त्यांनी राज्याचे ब्रँड अॅम्बेसेडर बनण्यास सहमती दर्शवल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. सलमान खान यांच्या कुटुंबाचे इंदूरशी जवळचे नाते असल्याने त्यांनी सहमती दर्शवल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.

सलमान यांचे वडिलोपार्जित घर इंदूरमध्ये आहे. येथील कल्याणमल नर्सिंग होममध्येच सलमान यांचा जन्म झाला होता. ग्वाल्हेरमधील सिंधिया शाळेतही काही काळ ते होते. सलमानचे वडिल सलीम खान बालपणी आणि तारुण्यात इंदूरमध्येच स्थायिक होते. त्यानंतर चित्रपट उद्योगात काम करण्यासाठी ते मुंबईत गेले. मुंबईत गेल्यावर प्रसिद्ध लेखक म्हणून ते नावारुपास आले, असे कमलनाथ यांनी सांगितले.

सलमानकडे सध्या दोन मोठे चित्रपट असून त्यातील भारत चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटचा ट्रेलर 25 जानेवारीला रिलीज करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ईदच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.तर संजय लीला भन्साली यांच्या एका प्रेमकथेतही सलमान दिसणार आहे. सलमान- संजयची जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here