Skip to content Skip to footer

hinjawadi : दोन वेगवेगळे पीएफ खाते काढून कंपनीची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत कायमस्वरुपी कामगार असताना देखील दुसऱ्या कंपनीच्या नावाने पीएफ खाते काढून त्या खात्यावर परस्पर रक्कम भरून फसवणूक केल्या प्रकरणी बहीण भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशांत कुमार परिमल (वय 40, रा. शिवणे रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अमोल सुर्यभान धुमाळ व सुमन सुर्यभान धुमाळ (दोघे रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा फिर्यादी यांच्या श्रीगणेश लेबर लॉज ऍडव्हर्टाईज या कंपनीत कायमस्वरुपी कामगार होता. त्यासाठी कंपनीद्वारे त्याचा पीएफ (भविष्य निर्वाह निधी) नियमीतपणे भरला जात होता. मात्र त्याने गणेश लेबर लॉज ऍडव्हर्टाईज यांच्याकडे कंत्राट असलेले वेदश्री, तिरुमला व समीशा या तीन कंपन्याच्या नकळत बेकायदेशीररित्या पीएफ खाते खोलून तेथेच सुमन हिचेही पीएफ खाते काढून त्यामध्ये कंपनीकडून ठरावीक रक्कम भरत होता. ही बाब निदर्शनास येताच आपल्या पदाचा गैरवापर करुन कंपनीची फसवणुक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धुमाळ बहीण भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a comment

0.0/5