मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य उत्तम आवारी, उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे, पर्यवेक्षक यादव चासकर, भारतीय संरक्षण दलात कार्यरत असलेली अश्विनी लबडे, निर्मला बाणखेले आदी उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर, लक्ष्मीबाई पाटील, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कर्तबगार महिलांच्या कार्याविषयी व जागतिक महिला दिनाविषयी निर्मला बाणखेले यांनी माहिती दिली. सिद्धी गांजाळे, आदिती मोढवे, निकिता बोर्डे, सृष्टी निघोट यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन लता गेंगजे, प्राची चौधरी, उज्वला बाणखेले, अंजली चिखले, सोनाली सोनवणे, मनिषा थोरवे, नंदा केंगले, सुवर्ण गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती उपार यांनी केले तर माधव कानडे यांनी आभार मानले.