दादर चौपाटीला होणाऱ्या नव्या विविंग गॅलरीमधून समोरच ‘सी लिंक’ दिसेल. या सी लिंकवर दरवर्षी ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आतिषबाजी आणि लेझर शो करण्यात येतील. ही आतषबाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवं लँडमार्क होईल, अशी घोषणा खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या दादर- माहीम चौपाटीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या भूमिपूजन सोहळयाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, आमदार सदा सरवणकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
वरळी ते माहीम चौपाटी या सुमारे ५ किमीच्या समुद्रकिनाऱ्याला ‘नवा लूक’ देणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा ज्ञानेश्वर उद्यान ते पांडुरंग नाईक मार्ग हा सुमारे ४७५ मीटरचा आहे. सुमारे ४.७२ कोटी रुपये खर्च करून या पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यामध्ये २० फूट लांबीचा पदपथ, सोलार पॅनल बसविलेल्या शेड्स, दादर चौपाटीचा इतिहास सांगणारी भित्तिचित्रे, लँडस्केप गार्डन्स, विविंग गॅलरी अशा अनेक सोयीचा अंतर्भाव असणार आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील टप्प्यांत संपूर्ण ५ किमीच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे असे ही सांगण्यात आलेले आहे.
खासदार राहुल शेवाळे यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक कामे मोठी कामे मार्गी लागली आहेत. त्यात अत्यन्त महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे दादर-नायगाव येथील बीडीडी चाळीतील भाडेकरूंना ५०० चौरस फुटाच्या घरासाठी खा.राहुल शेवाळे यांनी अथक प्रयत्न केले आहे आणि लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
आज धारावी विकास प्रकल्पा बाबत महत्वाची बाजू शासनाकडे मांडण्याची भूमिका सुद्धा खा. राहुल शेवाळे यांनी केली आहे आज बृहमुंबई महानगर पालिकेचा असलेला दांडगा अनुभवातून नवीन मुंबई उभे करण्याचे स्वप्न खा. राहुल शेवाळे पूर्ण करत आहे.