Skip to content Skip to footer

आता गौतम गंभीर खेळणार भाजपच्या पीचवर! उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर आता राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. गौतम गंभीरला भाजपची उमेदवारी मिळू शकते अशी माहिती गंभीरच्या निकटवर्तीयांनी दैनिक जागरणला दिली.

गंभीर दिल्लीतील एका लोकसभा क्षेत्रासाठी भाजपच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभा राहणार आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीला भाजपने सातपैकी सात जागांवर विजय मिळवला होता.

काही जागांवरील उमेदवारांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे आता काही जागांवर नवीन उमेदवार देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, गौतम गंभीरला एका जागेवर निवडणूकीसाठी उभे करण्याचा विचार भाजपा करत असल्याचे समजत आहे.

Leave a comment

0.0/5