Skip to content Skip to footer

पाकिस्तानची चिंधीगिरी, अभिनंदनवर एफआयआर

हिंदुस्थानच्या हवाई दलाचे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक करणे पाकड्यांच्या जिव्हारी लागले आहे. यामुळे जगभरात हिंदुस्थानला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने चिंधीगिरी सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर पाकड्यांनी हिंदुस्थानचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे. खैबर पख्तूनख्वा भागात बॉम्ब हल्ले केल्याप्रकरणी अभिनंदनवर पाकिस्तानच्या वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच हिंदुस्थानी विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात पाकिस्तानमधील 19 वृक्षांचे नुकसान झाल्याचा दावा येथील वन विभागाने एफआयआरमध्ये केला आहे.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे हिंदुस्थान विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमधील वृक्ष उद्ध्वस्त करत पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्री मलिक अमीन असलम यांनी गेल्या आठवड्यात रॉयटर्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हिंदुस्थानच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात कित्येक डझन झाडांची पडझड झाली व पर्यावरणास नुकसान झाल्याचे म्हटले होते.

हिंदुस्थानच्या हवाई दलाने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक करत शेकडो दहशतवाद्यांना ठार केले. मात्र हिंदुस्थानच्या हवाई दलाने जैशच्या तळांवर नाही तर जंगलात हवाई हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

Leave a comment

0.0/5