Skip to content Skip to footer

८६ वर्षीय मनमोहन सिंग उतरणार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे आता हळू हळू प्रत्येक पक्ष आता आपल्या उमेदवारांची घोषणा करू लागला आहे. कॉंग्रेस देखील आता आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरवात केली आहे तर दुसरीकडे पंजाबमधून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरलेला आहे.

मनमोहन सिंघ यांनी शिखांचे पवित्र स्थळ अमृतसरहून निवडणुक लढवली तर पंजाबी बांधवाना आनंद होईल, असं पंजाब प्रदेश काँग्रेस यांच्या कडून सांगण्यात आलं. त्यामुळे ८६ वर्षीय मनमोहन सिंघ हे या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मनमोहन सिंग यांनी या आग्रहा बाबत अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.तर २०१४ मध्ये अमृतसर या मतदार संघातून अरुण जेटली यांनी निवडणूक लढवली होती.

Leave a comment

0.0/5