Skip to content Skip to footer

‘पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागणार नसल्याचं लक्षात आल्याने पवारांनी माघार घेतली’

कोल्हापूर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पवारांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असा टोला आठवलेंनी लगावला.

शिवसेनेनं मुंबईची एक जागा मला सोडायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी मोठं मन दाखवावं आणि मला जागा सोडावी, अशी मागणी आठवेंनी केली आहे. दोन जागा देणं शक्य नसेल तर एक तरी जागा आमच्या पक्षाला द्या. दोघा नेत्यांनी ते ठरवावं आणि एक जागा रिपाइंला द्यावी. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायचं, हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांच आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जागा देण्याचा विचार करावा, असे आठवलेंनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5