Skip to content Skip to footer

Pune : गंगा धेंडे ‘परिवर्तनाचे दूत पुरस्काराच्या मानकरी

एमपीसी न्यूज – ‘स्फुर्ती महिला मंडळ आणि ‘स्माईल’ संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ (परिवर्तनाचे दूत) उपक्रमांतर्गत पर्व -३ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. चेंजमेकर पर्व -३ मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. चेंजमेकर प्रमोटर पद्मा कांबळे पुरस्कृत गटाच्या गंगा धेंडे यांनी ‘परिवर्तनाचे दूत पुरस्कार’ पटकावला.

टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रुपाली पानसरे यांना ‘उद्योगिनी पुरस्कार’, रत्ना नाईक यांना ‘विकासिनी पुरस्कार’, सोनाली गाडे यांना ‘स्वयंसिध्दा पुरस्कार’, ऊर्मिला गायकवाड यांना ‘शौर्य पुरस्कार’, वर्षा कुंभार यांना ‘स्वावलंबन पुरस्कार’, अनुराधा काळसेकर यांना ‘कलावंती पुरस्कार’ तसेच शीतल कुंभार पुरस्कृत ४ सेवा पुरस्कार देण्यात आले यामध्ये जयश्री घाडगे, स्वप्निल हुन्नूर, सुजाता झुरंगे, प्रणिती आंगरे यांचा सहभाग होता. मृणालिनी वाणी यांना ‘विशेष सहभाग’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

  • यावेळी सनत परमार, दर्शना परमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्याच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, माजी नगरसेविका वैशाली बनकर, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, नंदा लोणकर, विजया कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, चेंजमेकर्स ग्रुप सदस्या आदी उपस्थित होते.

 

पुरस्काराचे स्वरूप शाल, खासदार निधीतून दोन लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कामाचे सहकार्य देणारे खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून पत्र, चेंजमेकर ग्रुपमधील दोन जणांसाठी एमएस-सीआयटी मोफत कोर्सचे कुपन, ईश्वर परमार लिखित ‘आनंदाच्या वाटेवर’ पुस्तक आणि स्मृतिचिन्ह असे होते.

 

  • यावेळी सर्व चेंजमेकर प्रमोटरना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मृणालिनी वाणी, शीतल कुंभार, रत्ना नाईक, अनुराधा काळसेकर, सोनाली गाडे, उर्मिला गायकवाड, पद्मा कांबळे समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली दाभोळकर यांनी केले. प्रास्ताविक खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

 

Leave a comment

0.0/5