ISO मानांकन मिळवणारे देशातले पहिले शिवसेना खासदार म्हणून राहुल शेवाळे ठरले आहेत. दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना ISO मानांकन मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानींही राहुल शेवाळे यांचे कौतुक केले आहे. प्रभावी आणि जलद तक्रार-निवारण व्यवस्थापन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर आणि सरकारी योजनांविषयीची प्रभावी जनजागृती केल्यामुळे शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयाला ISO मानांकन प्राप्त झाले.
राहुल शेवाळे यांचा बद्दल बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले की, “खासदार किती उत्कृष्टरित्या काम करू शकतो यांचं उत्तम उदाहरण असलेले खासदार राहुल शेवाळे येत्या ५ वर्षात चौपट काम करतील” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. खासदार शेवाळे यांच्या, मातोश्री इथे पार पडलेल्या कार्यअहवालाच्या ई-प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.एक नगर सेवक ते खासदार झालेले खा. राहुल शेवाळे यांनी आपल्या विभागात अनेक कामे केली आहे.
काही दिवसापूर्वी शिवाजी पार्कला नवीन ओळख भेटावी तसे ३१ डिसेंबरला बाहेरील देशासारखा लुक भेटावा म्हणून वरळी ते माहीम चौपाटी या सुमारे ५ किमीच्या समुद्रकिनाऱ्याला ‘नवा लूक’ देणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा ज्ञानेश्वर उद्यान ते पांडुरंग नाईक मार्ग हा सुमारे ४७५ मीटरचा आहे. सुमारे ४.७२ कोटी रुपये खर्च करून या पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरण केले जाणार आहे . त्यात अत्यंत महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे दादर-नायगाव येथील बीडीडी चाळीतील भाडेकरूंना ५०० चौरस फुटाच्या घरासाठी खा.राहुल शेवाळे यांनी अथक प्रयत्न केले आहे आणि लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे