शिवसेना पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी सतत झटणाऱ्या आणि अहोरात्र काम करणाऱ्या गटप्रमुखांसाठी दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांनी मोफत विमा उतरविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्याची सुद्धा कायजी घेणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शिकवण खासदार राहुल शेवाळे यांच्या या मोफत विमाच्या कामातून दिसून आलेली आहे.आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राहुल शेवाळे यांच्या कामाचा अहवाल सादर करण्यात आलेला होता.
राहुल शेवाळे यांचा बद्दल बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले की, “खासदार किती उत्कृष्टरित्या काम करू शकतो यांचं उत्तम उदाहरण असलेले खासदार राहुल शेवाळे येत्या ५ वर्षात चौपट काम करतील” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. खासदार शेवाळे यांच्या, मातोश्री इथे पार पडलेल्या कार्यअहवालाच्या ई-प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. तसेच या प्रकाशन सोहळयाला मोफत विमय बद्दल माहिती ही देण्यात आलेली होती.
एक सामान्य कार्यकता ते केंद्रात खासदार झालेले राहुल शेवाळे यांनी आपल्या कामातून आज समाजावर आणि पक्ष प्रमुखांवर सुद्धा आपल्या कर्तेबगारीची छाप पडलेली आहे आणि येणाऱ्या आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीला भारी मताने निवडणूक येतील अशीच अपेक्षा त्यांच्या भागातील नागरिकांना वाटत आहे. आज पक्षवाढीसाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्याला भविष्यात कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागू नये म्हणूनच आज मोफत विमा उतरवुन कार्यकर्त्यांना एक प्रकारे सुरक्षा कवच शेवाळे यांनी बहाल केले आहे असेच बोलले जाते.