Skip to content Skip to footer

सुजय विखे पाटील अखेर भाजपचे अधिकृत उमेदवार….

काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजात विखे पाटील यांनी अखेर काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकून येणाऱ्या १२ मार्च रोजी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात विखे पाटील सुद्धा काँग्रेस पक्षाला सोडून भाजपा पक्षात प्रवेश करतील अश्याच चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगत असताना दिसत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला या दोन्ही पक्षातील नाराज उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सोडून इतर पक्षात जाण्याचे चिन्ह दिसून येणार आहे.

सुजात विखे पाटील यांनी नगर मतदार संघातून येणाऱ्या लोकसभेला रिंगणात उतरणार म्हणून मागील २ वर्षा पासून नगर मतदार संघ पिंजून काढलेला होता. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या जागा- वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे विखे-पाटील अडचणीत आले होते. ही जागा आपला भेटावी मुलगा सुजात याला भेटावी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खालच्या नेत्यांपासून ते थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती. परंतु या चर्चेतून काहीही तोडगा निघालेला नव्हता. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रश्न येतच नाही असे सुद्धा बोलून दाखविले होते.

सुजात विखे पाटील यांना राष्ट्रवादीने आपल्याला डावलेले आहे याची कल्पना आल्यानंतरच भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांनी भाजपा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतलेली होती या भेटी दरम्यान त्यांना नगर मतदार संघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतरच सुजाता यांनी भाजपात प्रवेश करण्याचे ठरविले होते असे ही बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला विखे पाटील युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार का? की आपल्या मुलाच्या प्रचार सभेत हजेरी लावणार हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल. परंतु या सर्वाला कारणीभूत पवार आणि विखे पाटील यांच्यातील वाद आहे असेच बोलले जाते.

Leave a comment

0.0/5