Skip to content Skip to footer

एका नातूंसाठी पवारांची माघार तर, दुसरा नातू म्हणतो साहेब तुम्हीच लढा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येणाऱ्या निवडणुकीतुन माघार घेऊन आपला नातू पार्थ पवार यांचे नाव जाहीर केले आहे. पुढे शरद पवार म्हणाले की, आमच्या घरात झालेल्या चर्चे मधून हा निर्णय घेतलेला आहे आणि पवार परिवारातून फक्त दोनच उमेदवार लोकसभा निवडणुकीला उतरणार असल्याचे भाष्य सुद्धा शरद पवार यांनी केले आहे. त्यातच पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आजोबांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला लावला आहे आणि येणारी निवडणूक आपणच लढा असेच सुद्धा नातवाकडून पवार यांना सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. स्थानिक पातळीवर निर्माण झालेली गटबाजी रोखण्यासाठी पवार यांनी देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे घोषित केले. दुसरीकडे मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवार देण्यासाठी आग्रह करण्यात येत होता. त्यामुळे शरद पवार यांनी कुटुंबियांशी चर्चा करून घरातील तीन उमेदवार नको म्हणत स्वतः माघार घेत युवा चेहरा असणारे पार्थ पवार यांना संधी देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

रोहित पवार यांच्याकडून आज फेसबुकवर पोस्ट लिहित, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असतच. आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा. असे म्हंटले आहे. त्यामुळे आपल्या नातवा कडून मिळालेल्या सल्याचा पुनर्विचार करून शरद पवार आपला निर्णय बदलतात का आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

Leave a comment

0.0/5