Skip to content Skip to footer

होय .’त्या’ पुलाची जबाबदारी आमच्यावरचं होती : मुंबई महानगरपालिका

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. यानंतर काही तासांत पालिकेने स्वत:हून हा पूल आमच्याचं अखत्यारित येत असल्याची कबुली दिली. त्यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5