Skip to content Skip to footer

तर पाकिस्तानने दाऊद व सलाउद्दीनला हिंदुस्थानला सोपवावे

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकड्यांचे धाबे दणाणले आहे, त्यामुळे इम्रान खान सरकारकडून शांततेसाठी चर्चेची द्वारं खुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानने देखील चर्चा आणि दहशतवाद एकत्र होणार हे ठासून सांगितले आहे. तसेच पाकिस्तान दहशतवाद संपवण्याबाबत गंभीर असल्यास त्यांनी दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना हिंदुस्थानच्या हवाली करायला हवे, अशी मागणी हिंदुस्थानने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. हिंदुस्थानने सातत्याने पुरावे देऊनही पाकिस्तान दहशतवादाविरोधात आपले बोटचेपे धोरण सोडत नाहीय. त्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून द्यावे. दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही हिंदुस्थानी नागरिक असलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तत्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावले आहे.

Leave a comment

0.0/5