Skip to content Skip to footer

नावात राष्ट्रवाद असला तरी अंगी राष्ट्रवाद येत नाही -देवेंद्र फडणवीस

देश चालवण्यासाठी ५६ पक्षाचे सरकार चालत नाही, तर ५६ इंचाची छाती लागते. ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला लगावला आहे. काल शिवसेना आणि भाजपा महायुतीची जाहीर सभा करवीर नगरीत पार पडली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला भक्कम सरकार मिळणार आहे. भाजपा-सेना युती अतूट असून ती सत्तेसाठी नाही, तर विचारांची आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत केला. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षाच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरात वाढवण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती.

सभेला झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा उल्लेख करून आपण नतमस्तक झालो आहोत, ही युतीच्या विजयाची नांदी आहे, असा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. देशाला समर्थ सरकार मोदींच्याच नेतृत्वाखाली मिळू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी ही मॅनेजमेंट कंपनी आहे. विरोधकांना उमेदवार मिळत नाही. ज्यांना उमेदवारी दिली ते ती परत करत आहेत. नावात राष्ट्रवाद असला तरी अंगी राष्ट्रवाद येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमचा हिंदुत्ववाद जातीधर्माच्या पलीकडे जाणारा आहे. भाजप-सेना युती हा फेविकॉल जोड असून तो कधीही तुटणार नसल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युतीच्या दहाही जागांवर युतीचा विजय होईल असे सूचक विधान केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना स्वतःची उमेदवारी मागे घेऊन आपल्या नातवाला आणि मुलीत सुद्धा उमेदवारी मागे घेण्यास लावावे असा सल्ला नाव न घेता शरद पवार यांना दिलेला आहे. पुढे रासपचे महादेवराव जानकर, रिपाईचे आठवले, सदाभाऊ खोत यांनी सुद्धा महाआघाडीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर सडाडून टीका केली होती.

Leave a comment

0.0/5