Skip to content Skip to footer

सांगलीत काँग्रेस पक्षाला धक्का, प्रतीक पाटील यांचा काँग्रेस पक्षाला राम-राम

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला गळती लागावी तशी काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिलेली आहे. त्यातच सांगलीतील कट्टर काँग्रेसी घराणे म्हणविणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नातवाने म्हणजे प्रतीक प्रकाशभाऊ पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. तसे त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना पाठविलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळातच काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठे खिंडार पडलेले आहे.
             आपल्या राजीनामा बद्दल बोलताना प्रतीक पाटील म्हणले की, काँग्रेसला आता वसंतदादा घराणे नको आहे, तर आम्हाला काँग्रेस नको असे प्रतीक पाटील यांनी बोलून दाखविले. आता काँग्रेस पक्षाशी माझ नातं तुटलेले आहे परंतु वसंतदादा यांच्या नावाने मी समाजकार्य करतच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पण ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांना आता उधाण आले आहे. कारण प्रतीक पाटील हे भाजप नेते महसूल मंत्री चंद्रांतदादा पाटील यांच्या संपर्कात असल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीकडून देण्यात आली होती.
                काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना नगरमधून लोकसभा उमेदवारी देण्यात आली. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता प्रतीक पाटील यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस सपुष्ठात येणाच्या मार्गावर दिसून येत आहे. परंतु प्रतीक पाटील हे काँग्रेस पक्षावर का? नाराज आहे हे अदयाप समजू शकले नाही आहे.

Leave a comment

0.0/5