विरोधक सध्या महाआघाडी करून सुद्धा “कुत्र्या मांजरा सारखे भांडत आहे” असा घणाघात आरोप भाजपा खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर केलेला आहे. काँग्रेस पक्षाची सद्याची परिस्थिती “धोबी का कुत्ता न घर का, ना घाट का” अशीच झालेली आहे. असे पूनम महाजन म्हणाल्या होत्या. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीचा सुद्धा खरपूस समाचार घेतलेला आहे. येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पूनम महाजन गुजरातच्या नवसारीच्या दौऱ्यावर होत्या. तसेच राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीका केली होती.
आज लोकसभेच्या तोंडावर सर्वच पक्षाने प्रचारासाठी कंबर कसलेली आहे. त्यातच येणाऱ्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठी कमी कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या कमी कालावधीत जास्तीत-जास्त मतदारानकडे पोहचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच गुजरात मध्ये मराठी उमेदवार आणि मराठी मतदार या विभागात असल्यामुळे या उमेदवाराच्या प्रचाराच्या कामाची जबाबदार पूनम महाजन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचं संमेलन भरताना कधी पहिले आहे का? तिथे भाड्यावर आणलेले लोक काँग्रेस संमेलनात दिसतात अशी टीका सुद्धा महाजन यांनी काँग्रेस पक्षावर केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आर. सी. पाटील हे मैदानात उतरले आहे. आज मराठी माणूस निवडणुकीला उतरल्यामुळे मी गुजरात राज्यात त्यांच्या प्रचाराला आलेली आहे. असे सुद्धा पूनम महाजन यांनी बोलून दाखविले होते. गुजराती जनता आणि माझे वडील प्रमोद महाजन यांचे अधिकच जवळचे नाते होते आणि आता त्याची कन्या आपल्या मराठी शिलेदारांच्या मदतीला धावून आलेली आहे असे सुद्धा पूनम महाजन यांनी बोलून दाखविलें होते.