Skip to content Skip to footer

जाणते आजोबा नातवा समोर मुके..मुके; पवारांची आशिष शेलार यांनी उडवली खिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षा-पक्षातील वाद आता समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हापरिषद सदस्य रोहित पवार यांनी भाजपा पक्षावर तोफ डागली होती. भाजपा पक्षात सुद्धा घराणेशाही असलेले पक्षच प्रवेश करत आहे अशी टीका केली होती त्यावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केली होती. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांची खिल्ली उडवली आहे.

एका नातवासाठी शरद पवारांनी माघार घेतलेली आहे तर दुसऱ्या नातवाने त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शरद पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नाही हाच धागा पकडत शरद पवार यांच्यावर आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे .आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा…दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच “पार्थ” मीच लढणार… आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोबांच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके” असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षात वाद होण्याची चिन्ह नाकारता येणार नाही आहे.

Leave a comment

0.0/5