Skip to content Skip to footer

सुजय मारणार मुसंडी तर पार्थ “रेड झोन” मध्ये…..

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्या टप्यातील मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक महाआघाडीची मोट बांधत मैदानात उतरले आहेत. तर महाराष्ट्रात शिवसेना – भाजप विरुद्ध कॉंग्रेस – राष्ट्रवादी सामना होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा युतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एबीपी माझा यांच्या सर्व्हेनुसार संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ आणि नगर मतदारसंघात भाजप – शिवसेना उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे येथून पुन्हा एकदा विजयी होताना दिसत आहेत.

नगरमध्ये भाजपचे सुजय विखे हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसू शकतो. येथे शिवसेना उमेदवार जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाची लढत बनलेल्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी पुन्हा एकदा विजयी होण्याची शक्यता आहे. या सर्वे नुसार भाजपा पक्षाला २० जागा, शिवसेना पक्षाला १८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5