Skip to content Skip to footer

आम्ही विखेंना विकत घेऊ नाही तर फुकट घेऊ तो आमचा प्रश्न आहे चंद्रकातदादा पाटील

आम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट घेऊ तो आमचा प्रश्न आहे तुम्हीच महाआघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या त्या न भेटता तुम्हाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे असा खोचक टीका महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी भाजपा पक्षावर सुजय विखे पाटील यांना विकत घेतल्याची टीका भाजपा पक्षावर केलेली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की,”आम्ही विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय आहे. तुम्ही मागितलेल्या दोन लोकसभेच्या जागा तरी तुम्हाला मिळाल्या का? याचे पहिले उत्तर द्या असेही ते यावेळी म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले की, आता शेट्टींनी एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे, याची काळजी करा. हातकणंगलेतही महायुतीला पोषक वातावरण आहे. ”सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागे तुमचा हात आहे काय, या प्रश्‍नावर श्री पाटील म्हणाले, माझा सर्वच ठिकाणी हात असतो. कोणत्याही चांगल्या कामात माझा हात असतोच.” सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळेच मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे वजन वाढले आहे असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही आहे.

राजू शेट्टी यांनी महाआघाडीकडे तीन जागेची मागणी केली होती परंतु काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने सांगलीची जागा शेट्टी यांनी सोडली होती. परंतु सांगलीतील काँग्रेस नेते तथा स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील हे काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज झाले होते. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सुद्धा दिलेला होता. या सर्व नाट्यप्रकरणात राजू शेट्टी ह्यांनी मंत्री पाटील यांच्यावर आरोप लावलेले होते त्यामुळे कुठेतरी या आरोपाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती.

Leave a comment

0.0/5