महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यातील वाद येणाऱ्या लोकसभेला अधिकच वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होते. त्यातच आज बारामती मतदार संघातील उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री पाटील हे बारामती मतदार संघात आलेले होते. त्यावेळी जेष्ठ नेते आणि मित्र पक्षाने सुद्धा हजारे लावली होती. यावर पाटील म्हणले “आधी बारामती हातात घेऊ नंतरच पुढचे लक्ष
ठरऊ” असे बोलून बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आव्हानच दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दहा ही जागेवर आमचे लक्ष आहे. पवारचे राजकारण हे जाती-पतीचे आणि फोडाफोडीचे राजकारण आहे. तसेच पक्षाने मला सांगितले आहे बारामती मध्ये जाऊन रहा. मागच्या निवडणुकी पेक्षा आताची समीकरणे बदलेली आहे. काँग्रेस राज्यात राहिलेली नाही आहे आणि ती कोणी संपवली यावर चर्चा होऊ शकते असे सुद्धा बोलून दाखवले होते. पुण्याचा उमेदवार अनेक चर्चे नंतर अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आला. त्यांना सक्षम उमेदवार देता आला नाही, तर सांगलीत वसंतदादा घराण्याला हाताला सोडून स्वाभिमानाची बॅट हातात घ्यावी लागली आहे ही काँग्रेसची हालत अशी सुद्धा टीका केलेली होती.