लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षा पाठोपाठ काँग्रेस सरकारने सुद्धा आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागरिकांच्या खात्यावर वर्षाकाठी ७२००० हजार रुपये जमा करणार असल्याची घोषणा केली होती परंतु विरोधी पक्षाने राहुल गांधी यांच्या या घोषणेला चुनावी जुमला म्हणून टीका केलेली होती. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सहा ठळक मुद्द्याला महत्व दिलेलं आहे. हम निभाएंगे असे या जाहीरनाम्याला म्हटले आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने काय आश्वासने दिली आहेत हे जाणून घेऊया….
गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची हमी, प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा गेले जातील. या योजनेसाठी गरिबीवर वार, ७२ हजार अशी घोषणा दिली आहे. तसेच २२ लाख लोकांना सरकारी नोकरी देणार. १० लाख लोकांना ग्राम पंचायतीत रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. ३ वर्षांसाठी उद्योग सुरु करण्यासाठी परवानगीची गरज नाही. मनरेगामधील कामाचे दिवस १०० वरुन १५० दिवस करणार, जीडीपीच्या ६ टक्के रक्कम शिक्षणासाठी खर्च करणार. देशात विद्यापीठ, आयआयटी, आयआएमसह महत्त्वाच्या शिक्षण संस्था गरिबांपर्यंत पोहोचवणार असे सुद्धा आश्वासन देण्यात आलेले आहे.
या जाहीरनाम्यात महत्वपूर्ण घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार. शेतकऱ्यांनी जर कर्ज फेडले नाही तर तो गुन्हा ठरवला जाणार नाही अशी सुद्धा तरतूद करण्याची हमी देण्यात आलेले आहे. परंतु काँग्रेस या दिलेल्या आश्वासना पैकी किती पाळते हे त्यांच्या मागील जाहीरनाम्यातूनच दिसून येत आहे. म्हणूच जनतेने त्यांच्या हातून सत्ता काढून भाजपा पक्षाच्या हातात सोपवली होती. आज इतकी वर्ष सत्ता भोगून सुद्धा जनतेची आश्वासने पाळणे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाला जमलेले नाही आहे. त्यामुळे आज केलेले वादे हे फक्त चुनावी जुमला आहे असेच बोलले जात आहे