Skip to content Skip to footer

पुण्यात पवारांचे जवळीक गायकवाड यांना डच्चू, मनसे गोटात आनंदी वातावरण

पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे मतदार संघासाठी इकडचा उमेदवार जाहीर झालेला आहे असेच बोलले जात आहे. परंतु अनेक दिवसापासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्या नावाला आता कायमचा पूर्णविराम मिळालेला आहे. प्रवीण गायकवाड यांनी मागील आठवड्यात कॉंग्रेस नेतृत्वावर केलेली टीका त्यांना भोवल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे गायकवाडांना उमेदवारी नाकारल्याने पुणे शहर मनसेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

शरद पवारांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून कॉंग्रेस उमेदवारी मिळण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. खुद्द शरद पवार यांनी गायकवाडांसाठी कॉंग्रेस दरबारी शब्द टाकल्याचे सांगण्यात येत होत. अनेक दिवस वेटिंगवर राहून देखील कॉंग्रेस नेत्यांकडून कोणतीच बोलणी न झाल्याने संयमाचा बांध सुटलेल्या गायकवाड यांनी थेट कॉंग्रेस पक्ष नेतृत्वावरच टीका केली होती. पक्ष अध्यक्षांना मार्तोडकर यांना भेंटीसाठी वेळ आहे. परंतु आमच्यासाठी वेळ नाही अशी टीका राहुल गांधी यांच्यावर गायकवाड यांनी केली होती.

दरम्यान, गायकवाड यांनी टीका करतातच खडबडून जागे झालेल्या कॉंग्रेसने त्यांना पक्ष प्रवेश दिला. आता पक्ष प्रवेश झाला म्हंटल्यावर शीघ्र प्रतिक्रिया देणारे गायकवाड शांत बसतील तर नवलचं. लाल महालात कार्यकर्त्यांची बैठक घेत, आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालेल अशी गर्जना त्यांनी केली. दरम्यान काही माध्यमांशी बोलताना ‘आपल्याला उमेदवारी मिळाल्यास मनसे देखील पाठींबा देईल, तसेच स्वतः राज ठाकरे पुण्यात सभा घेतील’, असा विश्वास गायकवाड यांनी बोलून दाखवला होता. परंतु काँग्रेसने त्याची उमेदवारी रद्द करून जोशी यांच्या नावाला पसंती दर्शवली होती.

संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे, एक विशिष्ट समाज, तसेच इतर विषयांवरून केलेली जातीयवादी विधाने मनसेला आवडणारी नाहीत. त्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढत, ‘ जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मनसे पक्ष अथवा मनसे अध्यक्ष .राजसाहेब ठाकरे यांचे नाव घेत माध्यमांशी वक्तव्य करू नये. म्हंटले होते. त्यामुळे या दबावा खालीच काँग्रेसने मनसेची बाजू उचलून धरून गायकवाड यांच्या जागी जोशी यांचे नाव जाहीर केले आहे.

Leave a comment

0.0/5