Skip to content Skip to footer

‘लाज कशी वाटत नाही’ काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रचारात नवी टॅगलाईन

‘मन की बात’ ही टॅगलाइन गाजल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आता ‘जन की बात’ करणार आहे. जनतेच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेस प्रचाराचा नवा फंडा वापरणार असून ‘लाज कशी वाटत नाही?’ ही टॅगलाइन घेऊनच प्रचारात उतरणार आहे. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा या विषयांवर केंद्र सरकारला पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज तसेच टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून प्रश्न केला जाणार आहे. काँग्रेस खासदार हुसेन दलवाई व राष्ट्रकादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे.

चुकीच्या धोरणांमुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरुण, विद्यार्थी, छोटे व्यापारी, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी असे सर्वच अडचणीत आले आहेत. कोणत्या आश्वासनांची पूर्तता झाली, असा सवालच या जाहिरातींच्या माध्यमातून विचारला जाणार असल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. देशभरातील तीन लाख शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील शेतकऱ्याच्या दुरवस्थेसाठी मोदी मागच्या सरकारला दोष आहेत मग मोदींनी गेल्या पाच वर्षांत नेमके काय केले, असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी यावेळी केला.

परंतु आजच्या सरकारकडे ५ वर्षच हिशेब मागताना राष्ट्रवादी आणो काँग्रेस पक्ष मागील १५ ते २० वर्हसचा हिशेब देण्यास टाळाटाळ करता आहे असेच दिसून येते. आज इतकाही वर्ष सत्ता भोगून सुद्धा या काँग्रेस पक्षाने देशाचा विकस केलेला तरी अजून दिसून येत नाही आहे. आज पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जातेला काँग्रेस पक्ष फक्त अश्वासनाच्या थापा देताना दिसून येत आहे.

.

Leave a comment

0.0/5