Skip to content Skip to footer

शिवसेना-भाजपा युती देणार मोफत घरे

काँग्रेसच्या जाहीरनाम्यापाठोपाठ भाजपाचाही निवडणूक जाहीरनामा याच आठवड्यात येण्याची शक्यता असून त्यानंतर शिवसेना-भाजपचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला जाईल. शिवसेनेने दिलेल्या अनेक विषयांचा समावेश वचननाम्यात केला जाणार असून मोफत घरांसारखी एखादी लोकप्रिय योजना वचननाम्यात असेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. १९९५ मध्ये ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची घोषणा युतीच्या वचननाम्यात करण्यात आली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ही योजना तयार करण्यात आली होती. तेव्हा युतीचे सरकार येण्यात या घोषणेचा मोठाच हातभार होता असे हे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर युतीची एकत्र वचननामा समिती तयार केली गेली आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई, अनिल देसाई, दिवाकर रावते आणि भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदि नेते या समितीत असणार आहेत. काँग्रेसने गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये टाकण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपा कडूनही एखादी लोकप्रिय घोषणा केली जाण्याची शक्यता असून शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या राममंदिराचाही केंद्रीय वचननाम्यात समावेश असेल.

युतीच्या निर्णय आधी भाजपाने शिवसेना पक्षाला दिलेल्या अश्वसना पैकी ५०० चौरस फूट पर्यतंच्या मुंबई आणि ठाणे मधील घरांना कर माफी देण्यात आलेली आहे. तसेच “नाणार जाणार” या आश्वासनाची पूर्तता सुद्दा मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा देऊन पूर्ण केली आहे. आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याच्या योजनेचा सुद्धा युतीच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे युतीचा जाहीरनामा हा सर्वसामान्य जनतेचा जाहीरनामा आहे असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5